Managing Commitee

P. S. Patil
Founder
मी पी. एस. पाटील, पुण्यातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत ‘कार्यालयीन अधीक्षक’ म्हणून कार्यरत असून, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून Morana Foundation ची स्थापना केली आहे. समाजविकासाच्या कार्यात विशेष रुची असून, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाश्वत व परिणामकारक उपक्रम राबविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. गावात समाजोपयोगी कार्यांची परंपरा असली तरी त्याला अधिक संघटित दिशा व गती देण्यासाठी माझ्या टीमसह मोरणा फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पर्यावरणसंवर्धन व सामाजिक जागरूकता या क्षेत्रांत नियोजनबद्ध काम करून समाजात सकारात्मक व दीर्घकालीन बदल घडवणे हे आमचे ध्येय आहे.
I am P. S. Patil, working as an ‘Office Superintendent’ at a reputed educational institution in Pune. With a strong sense of social responsibility, I established Morana Foundation. I have always had a keen interest in social development and continuously strive to implement sustainable and impactful initiatives for the overall progress of society. Although there has been a tradition of social service in our village, Morana Foundation was established along with my dedicated team to provide it with a more organized direction and momentum. Through this organization, our aim is to bring about positive and long-term change in society by working in key areas such as education, healthcare, environmental conservation, and social awareness.

Savita Patil
President
मी सौ. सविता सचिन पाटील, मोरणा फाउंडेशन, तडवळेची अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. मी गृहिणी असून, राजकारणापेक्षा समाजकार्याची अधिक आवड आहे. संस्थेच्या माध्यमातून सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत असून, सर्वांच्या सहकार्याने हे कार्य पुढेही सुरू ठेवण्यास कटिबद्ध आहे.
I am Mrs. Savita Sachin Patil, serve as the President of Morana Foundation, Tadawale. I am a homemaker with a strong interest in social work over politics. Through the foundation, we consistently carry out social welfare activities and remain committed to continuing this work with collective support.

Bhimrao(Rahul) Patil
Vice - President
मी श्री. भीमराव (राहुल) नामदेव पाटील, मोरणा फाउंडेशन तडवळेचा उपाध्यक्ष आहे. मी मुंबईतील भायखळा येथे भाजीपाला पुरवठा व हॉटेल व्यवसाय करतो. समाजसेवेची आवड जपत फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवितो व सामाजिक-राजकीय क्षेत्रात सक्रिय राहून समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे.
I, Mr. Bhimrao (Rahul) Namdev Patil, serve as Vice President of Morana Foundation. I run a vegetable supply and hotel business in Byculla, Mumbai, and actively work in social and political fields for community development.

Sunita Patil
Secretary

Shrirang Gaikwad
Treasurer
मी श्री. श्रीरंग गायकवाड, मोरणा फाउंडेशनचा खजिनदार म्हणून कार्यरत आहे. प्रगतिशील शेतकरी म्हणून कार्य करत असून, सामाजिक बांधिलकी जपत फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत समाजाच्या विकासासाठी योगदान देत आहे.
I am Mr. Shrirang Gaikwad, Treasurer of Morana Foundation. As a progressive farmer, I actively participate in various initiatives through the foundation, contributing to community development with a strong sense of social responsibility.

Hanumant Patil
Member

Vikas Mane
Member
मी श्री. विकासदादा माने, सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला असून, सलून व्यवसायात कार्यरत आहे. मी मोरणा फाउंडेशन, तडवळेचा संचालक असून, फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा करत आहे. संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात जबाबदारीने व उत्साहाने सहभागी होत योगदान देत आहे.
I am Mr. Vikasdada Mane, coming from a modest background and currently engaged in the salon business. I serve as a Member of Morana Foundation, Tadawale, and actively contribute to social service through the foundation. I participate in every initiative of the organization with responsibility and enthusiasm, contributing meaningfully to its work.

Nilesh Dabhade
Member

Shrikant Patil
Member
मी श्री. श्रीकांत विलास पाटील, मोरणा फाउंडेशन, तडवळेचा संचालक आहे. सध्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना लि., चिखली येथे टाईम ऑफिस विभागात क्लार्क म्हणून कार्यरत असून, माजी ग्रामपंचायत सदस्य आहे. राजकारण व समाजकारणाची आवड जपत, फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.
I am Mr. Shrikant Vilas Patil Member of Morana Foundation. I work as a Clerk at Vishwasrao Naik Cooperative Sugar Factory, Chikhali, and am a former Gram Panchayat member, actively contributing to social and political development.

Gorakh Patil
Member

Krushnat Mohite
Member
मी श्री. कृष्णात मोहिते, सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहे. व्यावसायिकदृष्ट्या भाजीपाला व्यापारात कार्यरत असून, मोरणा फाउंडेशनचा सदस्य म्हणून सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत समाजाच्या विकासासाठी योगदान देत आहे.
I am Mr. Krishnat Mohite. I work as a vegetable trader in Mumbai and, as a member of Morana Foundation, actively participate in social initiatives, contributing to community development.

Sachin S. Patil
Member

Sachin A. Patil
Member
मी श्री. सचिन आनंदा पाटील, मोरणा फाउंडेशनचा सदस्य असून, उद्योजक म्हणून कार्यरत आहे. फाउंडेशनच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत, समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देत आहे.
I am Mr. Sachin Ananda Patil, a member of Morana Foundation and an Entrepreneur. I actively participate in the foundation’s initiatives and contribute to the upliftment of society.

Mahesh Lohar
Member

Amol Patil
Member
मी श्री. अमोल पाटील, मोरणा फाउंडेशन, तडवळेचा सदस्य असून उद्योजक म्हणून कार्यरत आहे. व्यवसायासोबतच सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत, फाउंडेशनच्या विविध उपक्रमांमध्ये योगदान देत समाजाच्या प्रगतीसाठी सकारात्मक भूमिका पार पाडत आहे.
I am Mr. Amol Patil, a member of Morana Foundation, Tadawale, and an Entrepreneur. Along with my business, I actively participate in social work and contribute to various initiatives of the foundation, playing a positive role in the progress of society.

Arun Kamble
Member

Ananda Patil
Member
मी श्री. आनंदा भिवा पाटील, मोरणा फाउंडेशनचा संचालक असून, सध्या एपीएमसी मार्केट येथे स्वतःचा व्यवसाय करत आहे. व्यवसायासोबतच फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
I am Mr. Ananda Bhiva Patil, a Director of Morana Foundation, currently run my own business at the APMC market. Along with my business, I continuously strive to contribute to social service through the foundation.

Babaji Patil
Member

Jaysing Sutar
Member
मी श्री. जयसिंग सुतार, तडवळे येथील रहिवासी व मोरणा फाउंडेशनचा सदस्य आहे. गुरुवर्य एस. एच. पाटील विद्यालय, तडवळे येथे शिपाई म्हणून कार्यरत असून, शाळेच्या कामकाजात जबाबदारीने योगदान देत विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात मदत करतो. तसेच, फाउंडेशनच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत समाजसेवेत योगदान देत आहे.
I am Mr. Jaysing Sutar, a resident of Tadawale and a member of Morana Foundation. I work as a peon at Guruvarya S. H. Patil Vidyalaya, Tadawale, contributing responsibly to school operations and helping create a supportive environment for students. I also actively participate in the foundation’s initiatives and contribute to social service.

Sachin Bone
Member

Bajarang Dabhade
Advisor
मी बजरंग दाभाडे, मोरणा फाउंडेशनचा सल्लागार असून, साधना दिव्यांग मुलांचे विद्यालय, तासगाव येथे काळजीवाहक म्हणून कार्यरत आहे. सामाजिक कार्याचा अनुभव व दिव्यांग मुलांसोबतच्या कार्याच्या पार्श्वभूमीवर, फाउंडेशनच्या उपक्रमांमध्ये मार्गदर्शन व अंमलबजावणीत सक्रिय योगदान देत आहे.
I am Bajrang Dabhade, serving as an Advisor to Morana Foundation and working as a caregiver at Sadhana School for Differently-Abled Children, Tasgaon. With experience in social work and hands-on work with special children, I actively contribute to guiding and implementing the foundation’s initiatives.